शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGs) नऊ संकल्पना :
१) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव
(Poverty free and enhanced livelihoods Village)
गरिबी मुक्त गाव म्हणजे असं गाव, ज्या गावात सर्व समाज घटकांची भरभराट आणि वाढ होण्यासाठी आवश्यक उपजिविका विकासाची पुरेशी साधने उपलब्ध असतील. असं गाव ज्या गावात कुणीही मागे राहणार नाही यासाठी सर्व समाज घटकांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध असेल.
२) आरोग्यदायी गाव (Healthy Village)
गावातील सर्व समाज घटकांना पुरेशे अन्न मिळेल आणि गावातील कुपोषण नाहीसे होईल यासाठी शाश्वत आणि एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देणे; बालके, किशोर वयीन मुले-मुली, महिला आणि जेष्ठ नागरिक यांच्या आहारातील पोषणमूल्ये वाढविणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांची उपब्धता असणे.
३) बालस्नेही गाव (Child friendly Village)
गावातील सर्व मुलांना निर्धोक आणि सुरक्षित वातावरण तसेच चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
४) जलसमृद्ध गाव (Water Sufficient Village)
गावातील सर्व घरांसाठी वैयक्तिक नळजोडणीद्वारे मापदंडानुसार गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पाणी पुरवठा. उत्तम पाणी व्यवस्थापन, शेती आणि पाण्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील इतकी पाण्याची उपलब्धता, पाण्याचा पुनर्वापर आणि जलपुनर्भरण.
५) स्वच्छ आणि हरित गाव (Clean and Green Village)
बालकांच्या भविष्यासाठी बालस्नेही गाव तयार करणे. निसर्गसंपन्न हरित गाव निर्माण करणे, अपारंपारिक उर्जेचा वापर, स्वच्छता, पर्यावरणाशी अनुकूल व्यवहार आणि पर्यावरण रक्षण.
६) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव (Self-sufficient infrastructure in Village)
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने गाव स्वयंपूर्ण करणे, गावातील सर्वांना परवडणारी घरे, निर्धोक आणि पुरेशा प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे.
७) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव (Socially-Secured Village)
गावात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते याची भावना गावक-यांमध्ये निर्माण करणे. गावातील सर्व पात्र नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे
८) सुशासन युक्त गाव ( Village with Good Governance)
सुशासनाद्वारे गावातील सर्व लोकांना विविध विकास योजनांचा लाभ व जबाबदार सेवा वितरणाची हमी देणे.
९) लिंग समभाव पोषक गाव
(Engendered Development in Village)
गावात लिंगसमभाव स्थापन करण्यासाठी महिलांना समान संधी उपलब्ध करुन देणे.महिलांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे.